खेळ

नारायणराव काळे स्पोर्टस अकॅडमी समर स्पोर्ट्स कॅम्प चे उद्घाटन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चस्तरीय प्रशिक्षण देण्याचा एक प्रयत्न –संदिप काळे

आर्वी,दि.५:- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोचच्या माध्यमातुन प्रशिक्षण मिळावा हा एकमेव उद्देश या समर कॅम्पच्या आयोजनाचा असुन चांगले पट्टीचे खेळाडू निर्माण व्हावे या करीता माझ्याकडून जेवढ होत तेवढ करण्याचा माझा प्रयत्न असतो असे कृषक शिक्षण संस्थेचे सचिव संदिप काळे यांनी येथे प्रतिपादन केले.

            नारायणराव काळे र्स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने येथील ऑर्ट, कॉमर्स व विज्ञान महाविध्यालयाच्या क्रीडांगणावर समर स्पोर्ट्स कॅम्प २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू तथा प्रशिक्षक एस. आर. अरुणविष्णु, स्पोर्टस फिजीओथेरपिस्ट डॉ. आशिष अगरवाल यांच्या हस्ते रवीवारी (ता.तिन) करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.

            या उद्घाटन समारंभाचे अघ्यक्ष भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सौ. शोभाताई काळे ह्या होत्या तर, वर्धा नागरि सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष अनिल जोशी, कला, वाणिज्य व विज्ञान महाविध्यालयाचे प्राचार्य रवींद्र सोनटक्के, नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा (घा.) चे प्राचार्य डॉ. संजय धनवटे, कृषक इंग्लिश विध्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता हिवसे, कृषक इंग्लिश (माध्यम) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय डोळस हे प्रमुख अतीथी होते.

            पुढे ते म्हणाले की, तालुका स्तारावरील खेळाडूंकरीता चांगल्यात चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला असला तरी, यात अजुन सुधारणा करुन नवनवीन उच्चदर्जाची यंत्रणा कशी निर्माण करता येईल याकडे माझा कल आहे. जेणेकरुन मोबाईल संस्कृती मध्ये अडकलेला तरुण खेळाच्या मैदानाकडे वळत करता येईल आणी म्हणुनच या समर कॅम्पच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय दर्जाच प्रशिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे.

यावेळी एस. आर. अरुण विष्णु यांनी बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतांना आलेले अनुभव, आलेल्या अडचणी विषद केल्या आणी एकाग्रता व आत्मविश्वास कायम ठेवला तर आंतरराष्ट्रीयच काय तर, जागतीक स्तर सुध्दा गाठणे कठीण होत नाही असे सांगीतले. याशिवाय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा त्यांनी उत्तरे दिले. तसेच डॉ. अशिष अगरवाल यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. दर्शनकुमार चांभारे यांनी करुन आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता विविध खेळाचे प्रशिक्षक, खेळाडु व खेळ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button