निवेदन

आमदार, खासदाराचे शब्द केव्हा फळाला येणार. बुध्दविहार आणी सार्वजनीक वाचनालयाचे काम केव्हा होणार?. महाराणा प्रताप वार्डातील नागरीकांचा प्रश्न.

आर्वी,दि.२८:- भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिना निमीत्त आयोजीत कार्यक्रमात खासदार अमर काळे व आमदार सुमीत वानखेडे यांनी दिला शब्द केव्हा फळास येणार? व बुध्दविहार आणी सार्वजनीक वाचनालयाचे काम केव्हा होणार? असा प्रश्न महाराणा प्रताप वार्डातील नागरिकांचा आहे.

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त १४ एप्रील २०२६ ला महाराणा प्रताप वार्डातील बोधी छाया बुध्द विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना खासदार अमर काळे तसेच आमदार सुमीत वानखेडे यांनी शेकडो अनुयाया समोर बुध्दविहाराचे विस्तारीकरण आणी सार्वजनीक वाचनालयाचे बांधकाम करण्याचा शब्द दिला होता. याल तब्बल दोन महिने होवून गेले मात्र कामाचा थांगपत्ता नाही. निवेदन सुध्दा देण्यात आले होते. मात्र या बाबत बोलल्या सुध्दा जात नसल्याने अनुयायांमध्ये शंकेची पाल चुकचुकू लागली आहे.

बुध्द विहारा लगत जागा उपलब्ध आहे फक्त निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देवुन कामाला सुरूवात करावी अशी मागणी महाराणा प्रताप वार्डातील सागर मोटघरे, ऋषीं मेटघरे, अर्पित वाहाणे, सचिन वाहाणे, विजय मोटघरे, संजय मोटघरे, राहुपल नखले, विकी शेंडे,  सुरज शेंडे, कुणाल मोटघरे, सचिन मोटघरे, प्रशांत वाहाणे, सुरेश वाहाणे, नितीन फुले, प्रकाश मोटघरे, रामचंद्र्र वाहाणे, रामेश्र्वर मानकर, विकी सरदार, मेश्राम, करण वाहाणे, अमोल वाहाणे, सुदाम वाहाणे, स्वराज वाहाणे, आकाश मोटघरे, अमन मोटघरे, धनराज मोटघरे, संगीता वाहाणे, शिल्पा वाहाणे, सुमित्रा मोटघरे,  संगीता वाहाणे, छाया मोटघरे आदिंनी प्रेस नोटच्या माध्यमातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button