समारंभ

रसुलाबाद येथे आरोग्य पोषण आहार स्पर्धेचे आयोजन. ८० गावातील महिलांची होती उपस्थीती, ३५ महिलांनी नोंदवीला सहभाग.

आर्वी,दि.३:- ग्रामपंचायत रसुलाबाद, एन.सी.डी.क्लब, आरोग्य विभाग, उमेद व आयसीडीएस विभागाच्या संयुक्त विध्यमाने लगतच्या रसुलाबाद येथील जैन मंदिर हॉल मध्ये ‘आरोग्य पोषण आहार’ स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.  या शिबीराला ८० गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थीती दर्शवीली तर, ३५ महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवीला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मानकर हे होते. तर, रसुलाबाद ग्रामपंचायतचे सरपंच राजेश सावरकर, उपसरपंच शिलाताई कनेरी, इंगोले, चंद्रकला हेगडे, प्रीती तांबे, सौ. काकडे, अशोक गावंडे हे प्रमुख अतिथी होते.

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना, बदलती जिवनशैली, संतुलीत आहार आदिंवर प्रकाश टाकला तर, श्रीमती रुपाली यांनी पोषण आहार कसा असावा या बाबत सविस्तर माहिती दिली.

स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी कडधान्य व  पिष्टमय  पदार्थापासुन तयार केलेले विविध प्रकारचे व्यंजन घरुन बनवुन आणले होते. परिक्षणाअंती यातील निवड झालेल्या वैशाली ढोले यांना प्रथम क्रमांकाचे, कांचन सपाटे यांना व्दीतीय क्रमांकाचे तर स्वाती मांडवकर यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषीक प्रदान करण्यात आले.

आजच्या या धावत्या धकाधकीच्या जिवनात आहाराकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरीता शरिराला घातक अश्या रासायनीक फवारीणाचा उपयोग करुन पिकवीलेल्या भाजीपाल्यांचा आहारात उपयोग केल्या जात आहे. तसेच चायनीज व जंक फुडचे सेवन सुध्दा वाढले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन विविध रोगांना बळी पडावे लागत आहे. यातुन मार्ग काढुन नागरिकांना सुदृढ आरोग्य लाभावे या उद्देशाने या आरोग्य पोषण आहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता आयोजक अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर, उमेद कॅडर, स्टेप इंडीय टिम, एनसीडी क्लब आणी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button