क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त, सिध्दार्थ सार्वजनीक वाचनालयाच्यावतीने, “राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन”
स्वलिखित कविता १४ एप्रिल २०२६ पर्यंत टपालीने पाठवीणे आवश्यक

आर्वी,दि.१०:- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व विश्र्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचीत्य साधुन येथील सिध्दार्थ सार्वजनीक वाचनालयाच्यावतीने राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा दोन विषयावर घेण्यात येणार आहे. “ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा या स्पर्धेचा पहिला विषय असुन यातील विजेत्या स्पर्धकास एक हजार रुपयाचे प्रथम पारितोषीक वन प्रभा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने देण्यात येणार आहे. तर, दुसरे सातशे रुपयाचे पारितोषीक स्मृतीशेष तुषार जिंदे यांच्या स्मृती पित्यार्थ व तिसरे पाचशे रुपयाचे पारितोषीक सामाजीक कार्यकर्ते दर्पण टोकसे यांच्यावतीने देण्यात येणार आहे याशिवाय नागपुर येथील कु. निकिता सुनील ढाकणे यांच्यावतीने पाचशे रुपयाचे प्रोत्साहनपर पारितोषीक सुध्दा जाहिर करण्यात आले आहे.
स्पर्धेचा दुसरा विषय “आयुष्य घडवणारी पुस्तके” हा असुन यातील स्पर्धकाकरीता दिवंगत श्रीरामजी नारे स्मृती पित्यार्थ, किशारे नारे यांचेकडून एक हजार रुपयाचे प्रथम पारितोषीक, रंजना मात्रे बनसोड यांचेकडुन सातशे रुपयाचे दुसरे पारितोषीक, तर पाँथर महिला संघटना व नागपुर येथील सुविध्या सातपुते यांचे कडुन पाचशे रुपयाचे तिसरे पारितोषीक घोषीत करण्यात आले आहे. याशिवाय स्मृतीशेष पुनाबाई बारकुजी सोनटक्के यांच्या स्मृती पित्यार्थ दहा उत्कृष्ट कवितांना विशेष सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देवुन सन्मानीत करण्यात येणार येणार आहे.
येथील शासनमान्य सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने क्रांतीसूर्य जोतिबा फुले आणि विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८९६ पासून कार्यरत असलेल्या या वाचनालयाने सामाजिक आणि साहित्यिक वारसा जपत कवींना आपले विचार मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी
इच्छुक कवींनी आपल्या स्वलिखित कविता १४ एप्रिल २०२६ पर्यंत टपालीने ‘सुरेश भिवगडे ग्रंथपाल, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय, कन्नमवार नगर, आर्वी, जि. वर्धा ४४२२०१’ या पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क ६० रुपये असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. विजेत्या कवींना बक्षीस वितरण सोहळ्यात आपल्या कवितेचे सादरीकरण करावे लागेल. या स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध गझलकार प्रकाश बनसोड आणि ‘निळाई’ त्रैमासिकाचे संपादक प्रा. प्रवीण कांबळे हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण काळे, उपाध्यक्ष सहदेवराव भगत, कोषाध्यक्ष भानूदासजी फुसाटे, सचिव अशोकराव गाडगे, सदस्य प्रमोद खेडकर, रामदासजी नाखले, संध्या भगत आणि सुशीला दहाट परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी ८३०८९१३११५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

