महाराष्ट्रसार्वजनीक माहिती

युध्दाची झळ हळुहळू आर्वीला, व्यवसायीक सिलेंडर वितरण झाले बंद तर, घरगुती सिलेंडरचा साठा पुरेसा, व्यवसायीक आले अडचणीत तर, गृहीणीना पडली चिंतेत.

दोन दिवसापासुन ऑन लाईन बुकींग बंद, गॅस कंपनी सोबत संपर्क – तहसीलदार हरीष काळे

          आर्वी,दि.१३:- येथे सुध्दा इजराईल-इराण युध्दाची झळ हळुहळु पोहचू लागली असुन व्यवसायीक सिलेंडरचे वितरण  बंद झाल्यामुळे हॉटेलच नव्हे तर इतर व्यवसाय सुध्दा अडचणीत आले आहे. घरगुती सिलेंडरचा साठा पुरेसा असल्याचे सांगीतल्या जात असले तरी, गृहीणी मात्र भिविष्याच्या चिंतेत अडकल्याचे दिसुन येते.

शहरात लाठीवाला गॅस एजन्सी हि एकमेव वितरण कंपणी असुन घरगुती गॅस सिलेंडर वापरणारे सुमारे २२ हजार ग्रहाक आहे. इजराईल- इराण युध्द सुरू होण्यापुर्वी अवघ्या १५ दिवसात गृहिणींना सिलेंडर मिळुन जात होते मात्र युध्द सुरू झाल्यानंतर ६० रुपयाने सिलेंडर दर तर वाढवीलेच शिवाय सिंगल सिलेंडर खातेदारांना २५ दिवसानंतर तर, दोन सिलेंडर असलेल्या खातेदारांना ३० दिवसानंतर नंबर लावता येणार आहे. यावर सुध्दा ओटीपी (डिएचएल) नंबर मिळाला शिवाय सिलेंडर मिळणार नसल्याची अट घातली आहे. यामुळे अनेक अडचणीचा सामना गृहीणींना करावा लागत आहे. आधीच सिलेंडरचे दर वाढल्यामुळे गृहीणीच्या बजेट मध्ये वाढ झाली आहे. अशातच नेटवर्क मध्ये अडथळा असला तर ओटीपी सुध्दा येत नाही आणी सिलेंडर मिळण्यापासुन वंचीत राहावे लागत आहे. युध्दाच्या प्राथमीक स्तरावरच हि गत आहे तर, भविष्यात युध्दा वाढले आणी युध्दाची तिव्रता वाढली तर मिळत असलेले सिलेंडर सुध्दा मिळणार नसल्याचे संभाव्य परिस्थीती निर्माण होवु शकते परिणामी चुलीचा विचार करावा लागेल हि चितां सुध्दा गृहीणींना सतावत आहे.

तर , दुसरीकडे शहरातील बहुत:श हॉटेल मध्ये व्यवसायीक सिलेंडरचा वापर केल्या जाते. युध्दा नंतर वितरक कंपनी कडे व्यवसायीक सिलेंडर पुरवठा होत नसल्याने व्यवसायीक सिलेंडरचे वितरण शंभर टक्के बंद झाले आहे. याचा परिणाम व्यसायावर होत असुन त्यांना भट्टी अथवा चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र हे परवडण्याजोगे नसल्याने अनेकांनी व्यवसाया बंदच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे. परीणामी सुमारे पाचशेच्यावर कारागीर, महिला व युवकांच्या हाताचे रोजगार जाणार असल्याने चिंताजणक परिस्थीती निर्माण झाली आहे.

दोन दिवसापासुन ऑन लाईन बुकींग बंद

          गॅस सिलेंडर बुकींगच्या ऑन लाईन बुकींग यंत्रणे मध्ये बिघाड आल्यामुळे सिलेंडरचे बुकींग होणे बंद झाले असुन ग्राहक सिलेंडर पासुन वंचीत झाले आहे. तर, ज्यांनी बुकींग केले आहे त्यांना ओटीप नंबर प्राप्त होत नाही आणी ओटीपी नसल्यामुळे वितरक त्यांना सिलेंडर न देताच परत येत आहे. परिणामी ग्राहक वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार घेवुन पोहचत असुन लागु झालेल्या नवनवीन नियमाची यादीच त्यांच्या पुढ्यात मांडल्या जात असल्याने हतबल झालेल्या ग्राहकाला हात हलवत परत यावे लागत आहे.

गॅस कंपनी सोबत संपर्क – तहसीलदार हरीष काळे

          ऑनलाईन बुकींग होत नसल्याची व ओटीपी प्राप्त होत नसल्याने ग्राहकांची मोठ्याप्रमात हेळ सांड होत असल्याची माहिती तहसीलदार हरीष काळे यांना दिली असता त्यांनी गॅस कंपनी सोबत संपर्क करुन यावर तोडगा कढण्याच्या सुचना करणार आहो असे त्यांनी सांगीतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button