भ्रष्टाचार

शासकीय कार्यालयात चक्क शासन निर्देशांची पायमल्ली, वाताणुकूलन यंत्र (एसी) लावुन अधिकाऱ्यांची एैस, तर जनतेच्या पैशांची होत आहे लुट- भिम आर्मी रक्षक दलाची कारवाईची मागणी

वर्धा, दि.३०:- अधिकार नसतांना सुध्दा जिल्ह्याच्या कार्यालयातील अनेक अधिकारी स्वत:ची मालमत्ता समजुन आपल्या दालनात वाताणुकूलन यंत्र लावुन गार हवेची मजा घेत एैस करीत आहे. मात्र यामुळे जनतेच्या पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असुन शासन निर्देशांची सुध्दा पायमल्ली होत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच, यामुळे होणाऱ्या विजेच्या खर्चाची रक्कम वसुल करुन, शासन निर्देशाचे पालन न केल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई सुध्दा करण्यात यावी अशी मागणी भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे वर्धा जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांची आहे.

शासकीय कार्यालयात वाताणुकूलन यंत्राचा (एसी) वापर कोणत्या अधिकाऱ्याला करता येईल या करीता महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन १९९१ मध्ये निर्देश जारी करुन, ज्या अधिकाऱ्यांचे वेतन दर महा १८ हजार चारशे रुपये आहे त्याला वाताणुकूलीत यंत्राचा वापर करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर २०१२ ला यात बदल करुन ३७ हजार चारशे-६७ हजार ग्रेड वेतन अथवा त्या पेक्षा अधिक वेतन बैंड+ग्रेड वेतन असलेल्या अधिकाऱ्यांना वाताणुकूलीन यंत्राचा वापर करण्याची मुभा दिली होती. सातवा वेतन आयोग लागु झाल्यानंतर यात २५ मे २०२२ मध्ये पुन्हा बदल करण्यात आला आणी आता सातव्या वेतन श्रेणी संरचनेनुसार ज्या शासकीय अधिकाऱ्यांची वेतन श्रेणी एस-३० १४४२००-१,८२,२०० पेक्षा कमी आहे अशा अधिकाऱ्यांना आपल्या दालनात वाताणुकूलन यंत्र (एसी) बसवीता येत नाही असे शासनाचे सक्त निर्देश आहे.

यात, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, न्यायाधीश, सचिव व त्या दर्जाचे अधिकारी, सुप्रीडेंट इंजिनीअर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच काही विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी इत्यादींचा समावेश होतो.

मात्र वर्धा जिल्ह्यातील उपवन संरक्षक कार्यालय असो अथवा जिल्हा परिषद कार्यालय याशिवाय इतर कार्यालयातील ज्यांना अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांनी सुध्दा आपल्या दालनात वाताणुकूलन यंत्र (एसी) लावुन शासकीय निधीची उधळ पट्टी केली आहे. शिवाय शासनाच्या निर्देशाची पायमल्ली सुध्दा केली असुन अशांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

या शिवाय ज्यांना अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांच्या दालनातील वाताणुकूलीन यंत्र (एसी) ताबडतोब काढण्यात यावी. वाताणुकूलीन यंत्र कुणाच्या पैशामधुन लावण्यात आले याची चौकशी करण्यात यावी. शासनाच्या पैशामधून लावले असेल तर त्याची व विधृत बिलाची वसुली व्याजासह पगारामधुन करण्यात यावी. शासकीय निधीचा दुरोपयोग केल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी आदि मागणी भिम आर्मी संवीधान रक्षक दलाचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करुन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button