गोरस भंडारवरची बंदी उठवा, दुग्ध खरेदी,विक्री व उत्पादनाची परवानगी द्या!. खासदार अमर काळे यांची मागणी

आर्वी,दि.८:- महाराष्ट्रातच नव्हे तर, देश पातळीवर ज्याच्या उत्पादनाच्या शुध्दतेवर ग्राहकांचा विश्वास आहे अशा गांधीजींच्या ग्रामीण विकास धोरणावर आधारित चालवील्या जात असलेल्या वर्धेच्या नामांकीत गोरस भंडाराला दुध्द खरेदी विक्री व उत्पादनाची परवानगी देण्यात यावी अशी वर्धा लोकसभा मतदार संधाचे खासदार अमर काळे यांची मागणी असुन त्यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री, आयुक्त अन्न व औषधी प्रशासन तसेच जिल्हाधिकारी वर्धा यांना पत्र दिले आहे
गोरस भांडार ही महात्मा गांधीजींच्या विचारधारेवर आधारीत वर्ध्याच्या सहकार चळवळीतील एक ऐतिहासीक व प्रतिष्ठीत संस्था असुन सन १९३८ पासुन शेतकरी, उत्पादक, कर्मचारी व वितरक तसेच ग्राहक यांना जोडणारी एक लोकाभिमुख व्यवसायीक व्यवस्था आहे. या संस्थेच्यावतीने उत्पादीत गोरस पाकसह विविध उत्पादनांनी देशभरात आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गोरस भांडार हि केवळ गाईच्या शुध्द दुधाकरीताच नाही तर दुध्दापासुन तयार करण्यात येणाऱ्या विविध दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनाकरीता एक विश्वासपात्र संस्था आहे. या संस्थेच्या उत्पादीत मालाच्या शुध्दते बाबत ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे. ऐवढेच नाही तर संस्थेच्या लेखापरीक्षण अहवाला प्रमाणे सुचवीलेल्या सुधारणा सुध्दा संस्थेने केल्या आहे. विशेष म्हणजे शासनाचे अनुदान न घेता चालवील्या जाणारी ही संस्था पुर्णपणे स्वायत्त आहे. या शिवाय दुध उत्पादकाला सर्वाधीक भाव देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. केंद्रावर दुध उत्पादकांकडून थेट खरेदीकरुन तेथल्या तिथे दुध्दाची विक्री केल्या जाते. त्यामुळे दुधात भेसळ होण्याचा किंवा काही करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
अशा या विश्वासपुर्ण संस्थेवर बंदी लादल्यामुळे दूध उत्पादक शेतकरीच नव्हे तर, या माध्यमातुन चालवील्या जाणाऱ्या ग्राहक भंडारावर व संस्थेत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर आर्थीक कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांचा व्यवसाय हिरावल्या गेला असुन संपुर्ण कुटूंब रस्त्यावर आली आहेत. चुकीच्या लोकांच्या चुकीच्या उद्देशाला या कार्यवाहीमुळे खतपाणी घातल्या गेला असल्याचा आरोप सुध्दा या पत्रातुन करण्यात आला आहे.
लोकांच्या विश्वासावर उभी असलेली आणी शतकभराची गांधीवादी परंपरा जपणारी गोरस भांडार संस्थेवर झालेली ही कार्यवाही वर्ध्याच्या सामाजीक व आर्थीक हिताचे दृष्टीने घातक ठरत असुन या प्रकरणी तात्काळ सकारात्मक व न्यायपुर्ण निर्णय घेवुन गोरस भंडार संस्थेचे उत्पादन व वितरण केंद्र सुरु करण्याची विनंती खासदार अमर काळे यांनी या पत्राच्यामध्यमातुन केली आहे. तसेच गोरस भांडारच्या खरेदी, विक्री व उत्पादनावर लावलेली बंदी तात्काळ उठविण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा वर्तवीली आहे.

