आर्वीच्या विध्यार्थीनींनी पटकावीले स्टुडंट पोलीस कॅडेटचे दुसरे स्थान गांधी विध्यालयातील विध्यार्थ्यांचा वर्धा पोलीस अधिक्षकांनी केला सन्मान

आर्वी,दि.१:- वर्धा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने गत अनेक वर्षा पासुन राबवील्या जात असलेल्या स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमाच्या दुसऱ्यास्थानाचे मानकरी येथील गांधी विध्यालयाच्या विध्यार्थींनी ठरल्या असुन त्यांचा वर्धा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते एक मे ला शासकीय कार्यक्रमात सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला आहे.
विध्यार्थ्यांना शालेय जिवनापासुन सैनिकी प्रशिक्षण देण्याकरीता राबवील्या जात असलेल्या नॅशनल कॅडेट कोर्सचे तालुक्यातील एकमेव युनीट येथील गांधीविध्यालयात आहे. या युनीट मध्ये ज्या विध्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. अशा विध्यार्थ्यांकरीता पोलीस विभागाच्यावतीने स्टुडंट पोलीस कॅडेट हा उपक्रम राबवील्या जाते. या उपक्रमा अंतर्गत स्थानीक पोलीस स्टेशन व पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने वर्षभर विविध उपक्रम राबवीले जाते या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रशिक्षीत केल्या जाते व चांगली कामगीरी बजावणाऱ्या विध्यार्थ्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मान केल्या जाते.
येथील गांधीविध्यालयाच्या विध्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेवुन चांगली कामगीरी बजावली, यातील अदिती अंगाईतकर व कु. श्रध्दा कळंबे या विध्यार्थींनी सोबतच त्यांच्या मार्गदर्शिका स्मिती बिजवे यांचा सुध्दा महाराष्ट्र दिनी एक मे ला वर्धा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देवुन सत्कार करण्यात आला.
या विध्यार्थींनींचे परिसरात कौतुक केल्या जात असुन नगराध्यक्षा स्वाती गुल्हाणे, उपाध्यक्ष गौरव जाजु, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, न.प.मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, प्राचार्य विश्र्वेश्र्वर पायले, पर्यवेक्षीका ज्योती अजमीरे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले.

